Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज रथोत्सव हरिनाम गजरात

 श्री विठ्ठल, श्री विठ्ठल नामजयघोषात रथोत्सवात सेवा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे वार्षिकोत्सवातील श्रींची रथोत्सव मिरवणूक श्री विठ्ठल, श्री विठ्ठल नामजयघोषात करीत भाविकांनी श्रींचा रथ हाताने ओढत रथोत्सवात सेवा रुजू केली. यावेळी मार्गावर रांगोळ्यांचे पायघड्या, विद्युत रोषणाईने सजलेला श्रींचा भव्य रथ पुढे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पुष्प पाकळ्यांची उधळण करीत श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी करून उत्साहात श्रींचे दर्शन घेतले. श्रीचा पुण्यतिथी महोत्सव आणि अन्न संतर्पण मुक्तद्वार महाप्रसादास भाविकांनी गर्दी केली.  

 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ येथून रथोत्सव नगरप्रदक्षिणा करण्यास सुरुवात झाली. प्रदक्षिणा मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षांत घेऊन आळंदी पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस विभागाने प्रभावी बंदोबस्त आणि मिरवणुकीचे नियोजन परिश्रम पूर्वक केले. या साठी आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस  निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, भीमा घुंडरे , पोलीस मित्र योगेश जाधव, आळंदी ग्रामस्थानी रथोत्सवात सेवा रुजू केली. येथील ग्रामस्थ मानकरी श्री रानवडे परिवार यांनी श्रींचे रथोत्सवात नगराखाना सेवा देत नगरप्रदक्षिणा मिरवणुकीत परिश्रम घेतले. श्रींचे पुजारी सुधीर गांधी, सुरेश गांधी, गजानन गांधी व गांधी परिवार, अवधूत महाराज चक्रांकित परिवार यांनी स्वामी महाराज मूळ पीठ येथे श्रींचे रथोत्सवाचे परंपरेने जोरदार स्वागत केले. आळंदीतील नगरप्रदक्षिणा मार्गावर स्वामी भक्तांनी श्रींचे रथोत्सवाचे पुष्पहार, प्रसाद देत मिरवणुकीचे स्वागत करीत श्रींचे रथोत्सवात दर्शन घेत पूजा केली. आळंदी देवस्थान तर्फे रथोत्सवाचे स्वागत करण्यात आले. आवेकर भावे रामचंद्र संस्थान तर्फे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी संस्थान तर्फे स्वागत केले. श्रींचा रथोत्सव हजेरी मारुती मंदिर, मरकळ चौक,पाण्याच्या टाकी मार्गे कॉसमॉस बँक येथून आळंदी पोलिस स्टेशन मार्गे नगरपरिषद चौक मार्गे महाद्वार मार्गे स्वामी महाराज मठ येथे हरिनाम गजरात मार्गस्थ झाला.

 रथोत्सवात श्रींचा रथ माऊली मंदिर लगत श्रींचे स्वामींचे मूळपीठ येथे स्वागत त्यानंतर महाद्वार चौकातून माउली मंदिर समोरून भराव रस्ता मार्गे चाकण चौकातून नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा वैभवी रथोत्सव मठात आला. रथोत्सव मार्गावर श्रींचे स्वागतास रांगोळ्यांचे पायघड्या,पुष्पवर्षाव,स्वागत तसेच भाविकांनी श्रींची आरती करून पुष्पहार अर्पण करीत वार्षिकोत्सवातील रथोत्सवात श्रींचे दर्शन घेतले.  यास मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. श्रींचा रथोस्तव मूळपीठावर आल्यानंतर ह.भ.प.अवधूत 

चक्रांकित परिवाराने श्रींची पूजा केली. या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य होते. पुढे श्रींचा रथोत्सव माउली मंदिर समोर आल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने श्रींची पूजा झाली. आरती, प्रसाद वाढविण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, श्रींचे चोपदार सेवक, मानकरी, देवस्थानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 श्री विठ्ठल श्री विठ्ठल नाम जयघोषात ग्रामस्थांसह भाविकांनी श्रींचा रथ हाताने ओढत रथोत्सवात सेवा रुजू केली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी उत्साहात करण्यात आली. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान मठाचे पदाधिकारी, श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी परिवार, सेवक, वारकरी, भाविक, नागरिक उपस्थित होते. श्रींचे रथापुढे परंपरेने येथील ग्रामस्थ पै. सचिन रानवडे परिवाराने नगारखाना सेवा दिली. श्रींचे पुजारी आळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी सर्व कुटुंबीयांकडे श्रींपूजा,धार्मिक विधी, पोशाख आदी सेवा नित्यनेमाने परंपरेने केली जाते.

Post a Comment

0 Comments