Type Here to Get Search Results !

Alandi ‘सर्वोत्तम खासगी अभियांत्रिकी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ’

 पुण्यातील लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संस्थेस 


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे शहराच्या शिक्षण क्षेत्रात चऱ्होली बुद्रुक जवळील लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग (ADYPSOE) या महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) च्या ५५ व्या राष्ट्रीय वार्षिक प्राध्यापक परिषदेत महाविद्यालयास ‘सर्वोत्तम खासगी अभियांत्रिकी शिक्षण संस्था २०२५’ या अत्यंत महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही परिषद पाँडिचेरी येथील एस. एम. व्ही. अभियांत्रिकी संस्थेत उत्साहात झाली. 

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारुक सय्यद यांनी संस्थेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सय्यद म्हणाले: "हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे, यात शंका नाही. मात्र, हे यश केवळ प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विभागांतील सहकाऱ्यांच्या समर्पण आणि सांघिक कार्या मुळेच शक्य झाले आहे. मी हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमास समर्पित करतो." ISTE राष्ट्रीय पुरस्कार हा तांत्रिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात प्रमुख संस्थेतर्फे दिला जातो, त्यामुळे या पुरस्काराचे विशेष महत्व आहे.  

  या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (ADYPU) कुलगुरू डॉ. आर. के. जैन यांनी केले. राष्ट्रीय स्तरावरील हा मानाचा पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल अजिंक्य डी. वाय. पाटील संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. कमलजीत कौर यांनी महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments