गुणवंतांचे कार्याचे कौतुक
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी या संस्थेचे वतीने समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२५ अंतर्गत सोपान मारुती गवळी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी माजी नगरसेवक बबनराव बोराटे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश थोरात, खरेदी विक्री संघ चेअरमन अंकुशशेठ आंबेकर, लीड कॉम अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, संस्थेचे विश्वस्त अनिल सातपुते, विठ्ठल शिंदे, अतुल कानडे यांचेसह समाज बांधव आदी मान्यवर उपस्थित होते. समाज बांधवानी या पुरस्कार सोहळ्यातील गुणवंतांचा कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments