.jpeg)
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा शिरोली पुलाची, ता. हातकणंगले कोल्हापूरच्या मैदानावर उत्साहात झाल्या. या स्पर्धेत श्री. शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद ( पुणे विभाग ) शाळेने छत्रपती संभाजीनगर, अमरावती व सातारा अशा 3 विभागाला पराभूत करून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेतपद मिळवले.
विजयवाडा आंध्रप्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघाच्या संभाव्य संघांसाठी घेतल्या जाणाऱ्या सिलेक्शन साठी श्री. शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद (पुणे विभाग )च्या संघातील कु. आराध्या दौंडकर , कु. तनया बवले, कु. तेजस्वी झोडगे, कु. इशिका बवले, कु. ज्ञानेश्वरी बवले, कु. कादंबरी घेनंद या खेळाडूंची निवड झाली आहे.
या यशा बद्दल माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सभापती रमेश नारायणराव पवार, उद्योजक ऋषिकेश पवार, सचिव माजी मुख्याध्यापक अंकुश सांडभोर, मुख्याध्यापक दिलीप करंडे, क्रीडा शिक्षक बाप्पू साकोरे, शिवेकर सर, श्री लाड सर, श्री विलास नितनवरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना पदाधिकारी, ग्रामस्थांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments