भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन सभा
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, किरण येळवंडे, शिरीष कारेकर, आवाका भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, गोविंद कुर्हाडे, सुयोग कांबळे, अण्णासाहेब वाघमारे, राजेश लोंढे, अतुल रंधवे, राहुल डुमणे, अमोल कांबळे, ॲड. साहेब सुरवसे, समाधान झरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते महामानव भारतरत्न, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णआकृती पुतळ्यासह प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्यावर आधारित उपस्थितांनी मनोगते व्यक्त करून अभिवादन केले.
आळंदी तक्षशिला बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिन साजरा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त तक्षशिला बुद्ध विहारात अभिवादन सभेत दीपप्रज्वलन, बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील पठणातून धम्ममय वातावरणात अभिवादन सभा झाली. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी सामाजिक परिवर्तनास समर्पित त्यांच्या संघर्षमय वाटचालीस अभिवादन केले. सभेत आयु. प्रमोद भालेराव, आयु. विलास रणपिसे, आयु. आनंद रणदिवे, आयु. नितीन थोरात आणि आयु. नामदेव सुरपल्लीकर यांनी मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्याचा आढावा घेतला.
मान्यवरांनी भारतीय संविधान निर्मितीतील डॉ. आंबेडकरांची निर्णायक भूमिका, स्पृश्य-अस्पृश्यता निर्मूलना साठीचे त्यांचे लढे, कामगारांच्या हक्कांसाठी केलेली पुरोगामी भूमिका, पी.एफ आणि साप्ताहिक सुट्टीची तरतूद, तसेच महिलांस पगारी प्रसूती रजेचा क्रांतिकारी निर्णय यांचा उल्लेख केला. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची उपस्थितांनी उजळणी केली.
महापरिनिर्वाण दिना निमित्त संविधानिक मूल्यांचे रक्षण, सामाजिक समता व बौद्ध करुणा या तत्त्वांप्रती वचनबद्ध राहण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप धम्मपालन गाथेने झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनास तक्षशिला बुद्ध विहार समितीचे विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड, सुभाष भोसले, बाळासाहेब पो. भोसले, बाळासाहेब दा. भोसले, ज्ञानेश्वर रंधवे, भिमराव थोरात, प्रशांत रंधवे, संजय रंधवे, अशोक थोरात, अजित थोरात, सुधाकर गायकवाड, लहू डुमने, महेंद्र रंधवे, रोहित थोरात, दिलीप वहिले, रमेश थोरात, चारुदत्त रंधवे, सार्थक रंधवे, भारत थोरात आदींनी यशस्वी नियोजन करीत परिशम घेतले.



Post a Comment
0 Comments