अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता कीर्तनकार गोविंद महाराज गोरे यांच्या सुश्राव्य काल्याचे कीर्तनाने झाली.
सप्ताहाचे दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त ॲड रोहिणी पवार यांनी भेट दिली. यावेळी रोहिणी पवार यांचा ट्र्स्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्तनकार गोविंद महाराज गोरे यांचा सत्कार पै किसनबाबा लांडगे यांचे हस्ते झाला. या वेळी पिंपरी चिंचवड चे नवनिर्वाचित नगरसेवक माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर, उदय गायकवाड यांचा फेटा, उपरणे देऊन ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मृदंगाचार्य व्यंकटेश फड, विठ्ठल आबा गव्हाणे, प्रवीण काळजे, रोहिदास परांडे, गणेश महाराज तापकीर, रमेश घोंगडे, चंद्रकांत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सप्ताहात कीर्तनकार व मान्यवरांचे सत्कार ट्र्स्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, उपरणे, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
हरिनाम सप्ताहात श्रींची महापूजा, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा पारायण, महिला भजनी मंडळाची भजने, हरिपाठ, हरी किर्तन, हरिजागर, ग्रंथ दिंडी मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात झाले. महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ, वैभवी तुळस घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या. ग्रंथ दिंडी नंतर कीर्तन सेवा आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रींचे दर्शनासह कीर्तनास महिलांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


Post a Comment
0 Comments