Type Here to Get Search Results !

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पदी भावार्थ देखणे

डॉ. देखणे सध्या बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंपनीत ते एच. आर. हेड


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त पदी बी.व्ही.जी. कंपनीचे एच. आर. हेड भारूडकार, कीर्तनकार भावार्थ देखणे यांची प्रमुख विश्वस्त पदी निवड झाल्याचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. 

 या संदर्भात निवडीसाठी मंदिरात बैठा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विधीतज्ञ राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, विधीतज्ञ रोहिणी पवार, मुख्य व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.

  मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त पदी निवड डॉ. भावार्थ देखणे झाल्याचे सांगितले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी येथील कार्यालयात या निवडीसाठी बैठक झाली. प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांच्या अध्यक्षते खाली हि बैठक झाली. या बैठकीत पुढील एक वर्षा साठी ही निवड करण्यात आली आहे. सन २०२५ चे पालखी सोहळा प्रमुख म्हणून डॉ. भावार्थ देखणे यांनी काम पाहिले आहे. डॉ. देखणे सध्या बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंपनीत ते एच. आर. हेड असून आळंदी मंदिरात देखील बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंपनीचे कामगार सेवारत आहेत. इंग्रजी, मराठी देखील त्यांनी देश विदेशात कीर्तन, प्रवचन, भारूड या कलांचे माध्यमातून त्यांनी सेवा रुजू केली आहे. या साठी बैठक खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. 

 

Post a Comment

0 Comments