Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

गणेश याग, महाआरती, महाप्रसाद, मिरवणूक, देशमुख महाराज यांचे कीर्तन

 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :
येथील अखिल भाजी मंडई मंडळ गणेश मंदिरांसह लक्षशांती श्री गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय उत्साहात झाले. लक्षशांती श्री गणेश मंदिरात राष्टीय युवा कीर्तनकार, समाज प्रबोधनकार ह .भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सुश्राव्य कीर्तन हरिनाम गजरात झाले. हजारो भाविकांनी कीर्तन सोहळ्यात श्रवण सुखाची अनुभूती घेतली. या सोहळ्याचे आयोजन लक्षशांती श्री गणेश मंदिराचे प्रमुख युवा उद्योजक सचिन येळवंडे यांनी केले होते.

 येथील शांताई पार्क वडगाव रस्त्यावरील लक्षशांती श्री गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात सकाळी श्रीना अभिषेख, अथर्वशीर्ष पठण, श्री गणेश याग, श्रींची महाआरती, महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. यावेळी हरेश तापकीर, शांताबाई येळवंडे, लक्ष्मण येळवंडे, युवा उद्योजक सचिन येळवंडे, सागर येळवंडे, संतोष येळवंडे, नगरसेविका कांचन येळवंडे, किरण येळवंडे आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन समस्त शांताई पार्क रहिवासी, मित्र परिवार, सुपर बझार परिवार, दत्तकृपा डेव्हलपर्स येळवंडे परिवार, आळंदी चऱ्होली खुर्द ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले होते.

 येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील पुरातन श्री गणेश मंदिर, शिवतेज गणेश मंदिर, अखिल भाजी मंडई मंडळ गणेश मंदिर,  ज्ञानराज मित्र मंडळ गणेश मंदिर, राजे शिवछत्रपती गणेश मंदिर, टेमगिरे गणेश मंदिर, जय गणेश मंदिर, दत्तनगर श्री गणेश मंदिर आदी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. गणेश भक्तांनी श्रींचे मंदिरात दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले.

 येथील अखिल भाजी मंडई मंडळ गणेश मंदिरातील श्रींचे वैभवी गणेश मूर्तीस यावर्षी सुवर्ण झळाळी देण्यात आली. श्रींचे मूर्तीची लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली. विविध धार्मिक उपक्रम उत्साहात मंगलमय वातावरणात झाले. यावेळी श्रीनां अभिषेख सुप्रिया टनवे व विनायक टनवे यांचे हस्ते सपत्नीक अभिषेख झाला. भाविक, नागरिक, गणेश भक्त यांनी श्रीनां जलाभिषेख करण्यास गर्दी केली होती. वेदमंत्र जय घोषात पूजा, अभिषेख, आरती झाली. या प्रसंगी मंदार पवार, सुदीप गरुड, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब पवार, सागर प्रसादे, गिरीश तुर्की, माउली संस्थांनचे जेष्ठ व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, तानाजी कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.      

Post a Comment

0 Comments