वारकरी साधकांचा हरिनाम गजरात हरिपाठ ; रामरक्षास्तोत्र या ग्रंथाचे वाटप
अयोध्या श्रीराम मंदिर वर्धापन दिन आळंदीत उत्साहात साजरा करण्यात आला. जो प्राणप्रतिष्ठा समारोह अयोध्ये मध्ये झाला. त्या वर्धापना निमित्त हरिपाठ हरिनाम गजरात धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. मोहन महाराज शिंदे यांचे संस्थेतील साधकांनी सेवा रुजू केली. आवेकर - भावे श्री रामचंद्र संस्थानचे वतीने कार्यक्रमाचे संयोजन विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केले. हरिपाठ सेवेचे प्रसंगी ह. भ. प. रामचंद्र महाराज सारंग, ह. भ. प. रवींद्र भूमकर यांनी नियोजन केले. या प्रसंगी श्रींचे पुजारी महेश अयाचित, माऊलींचे पालखी सोहळ्याचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर तौर, आळंदी धाम सेवा संस्थेचे रोहिदास कदम, लक्ष्मण मेदनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत देश त्यातही महाराष्ट्र ही संतांची वारकरी संप्रदायाची भूमी असून या भूमीमध्ये देवाधिकांची संताधिकांची उपासना त्या त्या दिनी त्या त्या प्रसंगी मोठ्या आनंदाने करून त्या हरिपाठ, वेदमंत्र जयघोष, श्रींची आरती, प्रथा परंपरांचे पालन करीत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद घेता घेता आनंद देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता करत असते. याच अनुषंगाने मागील दोन वर्षा पूर्वी २२ जानेवारीला अयोध्येमध्ये श्री राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा धार्मिक मंगलमय वातावरणात झाली होती. अनेक वर्षांच्या लढ्यातून मागील २२ जानेवारी २०२४ या ऐतिहासिक दिनी मंदिराचे ही लोकार्पण झाले. त्या दिनाला ऐतिहासिकता आहे. याच भूमिकेतून झालेल्या वैभवी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे वर्धापन दिना निमित्त आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी यांचे वतीने मोठ्या उत्साहात हरिपाठ आदी कार्यक्रमांचे माध्यमातून जवळ जवळ येणाऱ्या सगळ्याच भाविकांना सार्थ स्वरूपाची रामरक्षा या ग्रंथाचे वाटप, प्रसाद म्हणून लाडू भाविकांना साधकांना वाटप करण्यात आले. त्याच दिनाचे स्मरण ठेवत आज ही आवेकर भावे रामचंद्र संस्थांनचे वतीने अध्यक्ष राहुल आवेकर, सर्व विश्वस्त यांचे मार्गदर्शनात श्री राम मंदिरात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.jpeg)
.jpeg)

Post a Comment
0 Comments