२४ व २५ जानेवारीला 'ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाने मला काय दिले' यावर निनाद
आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथील सभागृवतासेच विविध वर्ग खोल्यांमध्ये या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन २४ जानेवारी रोजी होऊन २५ जानेवारीला अंतिम स्पर्धा आणि लगेच भव्य पारितोषक वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धेत आळंदीत सुरू झालेला उपक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांसह तालुक्यातील शाळांत सुरू झाला आहे. संत साहित्यातून व्यक्तिमत्व विकास आणि सुसंस्कारित शिक्षण, सुशिक्षित नवसमाज निर्मितीसाठी प्रयत्न, शालेय मुलांचे माध्यमातून भावी पिढी सुसंकृत घडवण्याचा उपक्रम ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांचे माध्यमातून परिश्रम पूर्वक राबविला जात आहे. अनेक शाळांतून उपक्रम सुरू असून शाळांची ही मागणी वाढत आहे. आता पर्यंत सुमारे १५० वर शाळांनी हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने स्वीकारला आहे. पालक, नागरिक, शिक्षक आणि जाणकार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शालेय जीवनात अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले आहे.
या राज्यस्तरीय उपक्रमातील वक्तृत्व स्पर्धेसाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची विवेचन , ओळख श्री हरिपाठ या उपक्रमाने मला काय दिले या विषयावर स्पर्धा दोन गटात होत आहे. यात रोख स्वरूपाची पारितोषिके, प्रमाणपत्र, संत साहित्य आणि सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित केले जाणार आहे. आळंदी परिसरातील नागरिक, पालक आणि शालेय मुलानी तसेच साधकांनी या स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढून कौतुक करण्यास उपस्थित रहावे असे आवाहन ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांचे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश काळे यांचे संकल्पनेतून करण्यात आले आहे. ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवारातील सर्व घटक संस्थांचे पदाधिकारी स्पर्धेस उपस्थित राहून उद्घाटन सोहळा, पारितोषिक वितरण सोहळा आणि प्रत्यक्ष स्पर्धा दरम्यान मुलांचा उत्साह वाढविणार आहेत. पारितोषक वितरण सोहळ्या नंतर पसायदान आणि स्नेहभोजनाने राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेची सांगता होणार आहे.
या स्पर्धांचे आयोजन श्री ज्ञानेश्वरी एक परिवारातील घटक श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी पत्रकार संघ, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, अध्यापक साधक यांचे माध्यमातून करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments