Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी ; इंद्रायणी घाटावर आरती

अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात ;  श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट 

 
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील जया एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी भाविकांनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती झाली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविकांची उपस्थिती मोठी होती.  

 आळंदी मंदिरात भाविकांनी परंपरेने एकादशी दिनी गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्य व्यवस्थापक माउली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रींचे मानकरी, पुजारी, सेवक कर्मचारी आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांचे नियंत्रणात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने केली. मंदिरात दुपारचा फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री गुरुवारची श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, धुपारती परंपरेने होत आहे.  श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. सप्ताहातील कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली.

  मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्ता वरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेने परिश्रम पूर्वक काम पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून एकादशी दिनी सोय झाली. आळंदीत भाविकानी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. आळंदीत बेकायदेशीर वाहन पार्किंग आणि बेशीस्त वाहन चालकांवर कारवाई सुरु आहे. कारवाई टाळण्यासाठी आळंदीत रस्त्यावर वाहने पार्क करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात

येथील इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. एकादशी दिनी इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी तर्फे आरती सेवा रुजू करण्यात आली. करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजक अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, शोभा कुलकर्णी, सरस्वती भागवत, जयश्री भागवत, काशीबाई अडकिने, सुनंदा पवार, सुनीता हिळ्ळी, सुष्टी हिळ्ळी, कोंडा मंगल, समृद्धी भागवत, पुष्पा लेंडगर,    सुरेखा काळहोर, सुरेखा भांभरे, शैला तापकीर, जयश्री टकले, सुरेखा कुऱ्हाडे, केसरबाई कदम, कुशीवर्ता कुमसे, गजूताई चव्हाण, मुक्ता मस्के, पुनम नागरे, सुनाक्षी भागवत, अस्मिता गोरे, मोनिका बिडवे, रत्नमाला गेरे, उषाबाई गेरक पाटील, सुरेखा कुऱ्हाडे, सरला वाघ, मंगल वारे आदींसह महिला भाविक उपस्थित होते.

   इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येत असल्याचे यावेळी अनिता झुजम यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्तीसाठी सुरु असलेल्या उपक्रमात सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ कामकाज सुरु करण्याची गरज असल्याचे इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने संयोजक अर्जुन मेदनकर, अनिता झुजम यांनी आवाहन केले आहे. मान्यवरांचे हस्ते इंद्रायणीची आरती नंतर पसायदान, प्रसाद वाटप उत्साहात झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                          इंद्रायणी नदी घाटावर दादांना भावपूर्ण आदरांजली 

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसह ५ जणांचे बारामती येथे दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. पवार कुटुंबियांत तसेच राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधी हि भरून न येणारी आहे. दादांसह ५ मान्यवरांचे अपघातात जाणे या दुर्दैवी संकटातून त्यांचे कुटुंबियांना सावरण्याची शक्ती माउलींनी द्यावी अशी प्रार्थना करीत भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल वातावरणात इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने अर्पण करण्यात आली.     

Post a Comment

0 Comments