नागरी सेवा सुविधांना प्राधान्य देण्यासाठी प्रशासनास साकडे
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये विविध नागरी सेवा सुविधांची विकास कामे प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार असल्याचे नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषदेत सुमारे पाच वर्ष प्रशासकीय राजवट होती. या मुळे गेले पाच वर्षा पासून अनेक विकास कामे आणि नागरी सेवा सुविधा मिळण्या पासून नागरिक वंचित होते. आता निवडणुका होऊन पदाधिकारी निवडले गेले असल्याने विकास कामांना गती देण्यासाठी प्रभागातील प्राधान्याने विकास करायची कामे निश्चित करून अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्याची मागणी नगरसेवक या नात्याने केली आहे. येथील विविध विकास कामांना गती देण्यासाठी येत्या सर्व साधारण सभेत प्रभाग क्रमांक १० मधील विविध विकास कामे प्राधान्याने होण्यासाठी विकास काम बाब निहाय विषय पत्रिकेत विषय घेण्यासाठी देण्यात आले आहेत. या साठी मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांना सविस्तर पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले असल्याचे नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १० मधील विविध विकास कामे होणे आवश्यक असून प्राधान्याने विकासासाठी नागरी सेवा सुविधा मिळण्यासाठी मागणी प्रमाणे सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत पुढील प्रमाणे नागरीकांना सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्राधान्याने येत्या सर्वसाधारण सभेत विषय घेण्यास सुचविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यात ९ कामे सुचविण्यात आली आहेत. या मध्ये आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने वाहतूक कोंडी मुक्त आळंदी शहर असावे. यासाठी मार्गदर्शक फलक, पार्किंग, नो पार्किंग, वाहनमुक्त झोन, पी २ - सम तारखेस पार्किंग, पी १ - विषम तारखेस पार्किंग, यासाठी नियोजन, वाहतूक साक्षरता अभियान, विविध कामे करणे. प्रभाग क्रमांक १० मध्ये विविध रस्त्यांच्या दुतर्फा लहान, मोठ्या गल्लींसह मुख्य रस्त्यावर अत्यावश्यक त्या ठिकाणी विद्युत पोल वर उच्च दाब ( प्रखर विद्युत प्रकाश झोत ) दिवे बसवणे. प्रभागातील गृहनिर्माण सोसायटी मध्ये पाणीपट्टी कर आकारणी, अनामत रक्कम वैयक्तिक घरकुला प्रमाणे करण्यात यावी. निवासी वापर असल्याने निवासी वापराची पाणीपट्टी घेणे आवश्यक असताना सोसायटी मध्ये व्यावसायिक पाणी पट्टी शुल्क आकारणी, अनामत जास्त घेतली जाते. ती रद्द करण्यात यावी. आळंदी तीर्थक्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. वारकरी भाविकांचे पर्यटकांचे सहर्ष स्वागत करण्याच्या दृष्टीने पुणे आळंदी रस्त्या वरील आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावे आळंदीच्या वैभवात वाढ करणारी भव्य स्वागत कमान बांधकाम स्वरूपात विकसित करणे. आळंदी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील सर्वे नंबर १३५ ते १३८ या सर्व्हे नंबर मधून जाणारा देहू फाटा ते इंद्रायणी नदी मंजूर रस्ता विकसित करण्यास नागरिकांची मागणी आहे. तसेच संबंधित जागा मालकांनी मागणी केल्या प्रमाणे सरकारी मोजणी करून सदरचे रस्ते विकसित करून आळंदी शहराच्या मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करणे. पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने पर्यायी रस्त्यांच्या विकासासाठी मागणी प्रमाणे प्राधान्याने सरकारी मोजणी करणे. प्रभागात मंजूर झालेली कामे तांत्रिक अडचणी मुळे सुरू करता आली नाहीत . अशी कामे मुदत संपली असल्याने संबंधित कामांच्या विकासासाठी फेरनिविदा काढून कामे करणे.
प्रभाग क्रमांक १० मधील झोपडी धारकांना कायम स्वरूपी निवासी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन पक्की घरे अर्थात घरकुल विकसित करून देणे. आळंदी नगरपरिषद हद्दीतील जागेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन चे बांधकाम नियोजित जागेवर प्रशासकीय कामकाज पूर्ण करून भवन तात्काळ विकसित करणे . आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये अंगणवाडी सुरु करणे. या प्रमाणे विकास कामांचा समावेश असून या कामांसाठी आपण प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक झोंबाडे यांनी सांगितले.

.jpg)
Post a Comment
0 Comments