राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली
मुंबई ( अलंकापुरी न्युज ) : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह गोपनीयतेची शपथ लोकभवन येथे दिली.
मुंबई येथील लोकभवन मध्ये साधेपणाने शपथविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय, निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. शपथ विधी समारंभाचे नियमांचे पालन करीत शपथ विधी झाला.
तत्पूर्वी खासदार सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ गट नेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी खासदार सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड पक्षाचे बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव दिला. तर या प्रस्तावास अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.आमदार छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले.
सायंकाळी पाच चे सुमारास उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. राजभवनात अवघ्या १२ मिनिटांत साधेपणाने शपथ विधी कार्य्रकम पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक, वक्फ विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. स्व.अजितदादा पवार यांचे कडे असलेले अर्थ खाते मात्र वगळण्यात आले आहे. राज्यातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन असा शब्द देत असल्याचे त्यांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments