▪️हेडन जेम्स (ऑस्ट्रेलिया - टीम नेक्स्ट वेलोफिट)
मी 'नेक्स्ट वेलोफिट' (Next Velofit) संघाचे प्रतिनिधित्व करतोय. इथे पुण्यात येऊन मला खूप आनंद झाला आहे. स्पर्धेचे नियोजन अतिशय चोख आणि उत्तम आहे. आता प्रत्यक्ष शर्यतीसाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही काल पहिल्या टप्प्यातील मार्गाची पाहणी केली. येथील रस्ते सायकलिंगसाठी अगदी योग्य आहेत. आमची राहण्याची व्यवस्था आणि इथले जेवणही उत्तम आहे. लोक खूप प्रेमळ आहेत.
▪️तावी कन्निमे (एस्टोनिया - क्विक प्रो टीम)
मी एस्टोनियाहून आलो असून 'क्विक प्रो' (Quick Pro) संघाचा भाग आहे. मला येथील निसर्ग, ट्रॅक आणि एकूणच वातावरण खूप आवडले आहे. ही स्पर्धा आणि येथील उत्साह खरोखरच अप्रतिम आहे. मी नुकताच व्यावसायिक (Pro) सायकलस्वार झालो आहे आणि माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच भारतात येऊन अशा मोठ्या स्पर्धेत भाग घेताना मला खूप अभिमान वाटतोय. पुण्यातील लोकांचे स्वागत पाहून मी भारावून गेलो आहे. प्रत्येकजण आमचा उत्साह वाढवत आहे, हे पाहून खूप छान वाटते.
▪️जॉन (ऑस्ट्रेलिया)
"येथील रस्ते सायकल चालवण्यासाठी खूप चांगले, गुळगुळीत आणि वेगवान आहेत. आजचा मार्ग चांगला होता, पण उद्या काही कठीण चढाव (climb) आहेत, ज्यासाठी आम्ही तयार आहोत. पुण्यातील प्रेक्षकांचा प्रतिसादही थक्क करणारा आहे.
▪️की झे यी (मलेशिया - टीएसजी शिमानो तेरेन्गानू)
"नमस्ते, मी मलेशियाचा की झे यी आहे. भारतात येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. येथील लोक खूप मनमिळावू आणि खिलाडू वृत्तीचे आहेत. शर्यतीचा मार्ग (Race Route) अतिशय उत्तम आहे. रस्त्यांची स्थिती सायकलिंगसाठी पोषक आहे. मी तर म्हणेन की प्रत्येकाने सुट्टी घालवण्यासाठी एकदा तरी भारतात नक्कीच यावे!"

.jpeg)
.jpeg)

Post a Comment
0 Comments