Type Here to Get Search Results !

Pune एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६ ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना यंदाचे पुष्प प्रदर्शन समर्पित

प्रदर्शन २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत

 


पुणे ( अर्जुन मेदनकर ) :
पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये सालाबाद प्रमाणे या हि वर्षी भव्य एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत होत आहे. या वर्षीचे हे प्रदर्शन ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे. अशी माहिती प्रदर्शन समिती अध्यक्ष सुमन किर्लोस्कर, प्रदर्शन समिती उपाध्यक्ष सुरेश पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

  भव्य एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६ चे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी ( दि. २३ ) दुपारी १२ चे सुमारास होणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. डॉ. माधव गाडगीळ हे 'अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' या संस्थेचे मानद सदस्य होते. त्यांच्या निधनाने झालेली हानी भरून न येणारी असून, त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्घाटना नंतर विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या प्रदर्शनाची मुख्य लक्षवेधी आकर्षणे यात कलात्मक पुष्परचना, जपानी पद्धतीच्या ( इकेबाना ) पुष्परचना आणि विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. प्रदर्शनाचे औचित्य साधून एम्प्रेस गार्डन विविध पानाफुलानी नटलेली पाहण्याची संधी निसर्ग प्रेमी पुष्प रसिकांना मिळणार आहे. या प्रदर्शनात राज्यस्तरीय सहभाग रहाणार असून या मध्ये पुणे शहरासह कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक यांनी आपला सहभागी नोंदविला आहे. प्रदर्शना निमित्त विविध स्पर्धा बाग प्रेमींसाठी फुलांची मांडणी, फळे-भाजी पाला स्पर्धा आणि आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. तसेच प्रदर्शन पुष्प रोपे सजावट, बाग काम येथील कारागीर, कामगार यांनी परिश्रम पूर्वक प्रदर्शन सजविले आहे.  

  विद्यार्थ्यांचा देखील या प्रदर्शनात सहभाग असून शालेय मुलांमधील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी नुकत्याच झालेल्या चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धेत विविध शाळां तील सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शन शुक्रवारी ( दि. २३ ) दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत आणि २४ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत खुले रहाणार आहे. 

  १८३० पासून संस्था कार्यरत असून  'अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' ही संस्था एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन पाहत आहे. केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता, जनमानसात निसर्गाची ओढ आणि पर्यावरणा विषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले जाते. सर्व निसर्ग आणि पुष्पप्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी आणि डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापना तर्फे प्रदर्शन समिती अध्यक्ष सुमन किर्लोस्कर, प्रदर्शन समिती उपाध्यक्ष सुरेश पिंगळे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments