Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी शहरात सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे व यंत्रणा बसविण्यास मंजुरी

 सभेत १११ विविध विकास कामाचे विषयांना मंजुरी 

  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदी घाट हे पर्यटनाचे आणि धार्मिक विधींचे मुख्य केंद्र आहेत. सद्य स्थितीत घाटावर भाविक आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि अनुचित  प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण परिसराचे डिजिटल मॉनिटरिंग (Digital Monitoring) करणे आवश्यक असल्याने भाविक तसेच नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत आळंदी नगरपरिषद सभागृहाने सर्वानुमते नदी घाटांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे व यंत्रणा बसविण्यास मंजुरी दिली. अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचे अध्यक्षते खाली पहिली सर्व साधारण सभा खेळीमेळीचे वातावरणात झाली. या सभेत १११ विविध विकास कामाचे विषयांना मंजुरी देण्यात आली.  

शहरातील पुरातन कुंडांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करण्याचे कामास देखील मान्यता देण्यात आली.  आळंदी हे तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मुळे जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो वारकरी आणि पर्यटक या ठिकाणी दर्शनास येतात. शहरात ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक पुरातन कुंडे आहेत, जी सध्या गाळ साचल्यामुळे, देखभाल दुरुस्ती अभावी दुर्लक्षित स्थितीत आहेत. या कुंडांचे जतन करणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे. शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिक आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणे अपेक्षित आहे. या अभियाना‌द्वारे पुरातन वारसा जतन करून पर्यटनाला चालना देणे हा मुख्य उ‌द्देश आहे. स्वच्छ आणि सुंदर कुंडांमुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक व्यावसायिकांना फायदा होईल. कुंडांच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार असल्याने या साठी देखील मान्यता देण्यात आली. आळंदी नगरपरिषद हद्दीतील हवेली भागातील संपूर्ण परिसर खेड हद्दीतील आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत समाविष्ट करण्याचे विषयांस मंजुरी देण्यात आली. अशी माहिती मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिली.    

Post a Comment

0 Comments