Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी पंचक्रोशी मध्ये महाशिवरात्र दिनी विविध धार्मिक कार्यक्रम

माऊली मंदिरातील पुरातन सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी 

 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पंचक्रोशीतील विविध शिवमंदिरात भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त भल्या पहाटेपासून श्रींचे दर्शनास अभिषेकास पूजेस गर्दी करून रांगा लावून श्रींचे दर्शन घेत महाशिवरात्र व उत्साहात साजरी केली विविध ठिकाणी मंदिरांमध्ये प्रथा परंपरांचे पालन करीत नागरिक भाविकांनी श्री ना अभिषेक पूजा केली आळंदी येथील श्री वैतागेश्वर महाराज मंदिर श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील श्री वाघेश्वर महाराज मंदिर श्री नागेश्वर महाराज मंदिर श्री महादेव बेली मंदिर धनेश्वर महाराज मंदिर आदी शिवमंदिरांमध्ये भाविकांनी श्रींचे दर्शनास अभिषेकास ज्यालाभिषेकास गर्दी करून मने व्हावे पूजा करत महाशिवरात्र उपवास करून भाविक नागरिक यांना प्रसादाचे वाटप होत जात करण्यात आले. 

माऊली मंदिर परिसरातील रस्त्यांवर भाविकांची वर्दळ राहिली गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके तसेच पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी बंदोबस्त तैनात केला होता मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी करून वाहना प्रवेश करण्यावर मर्यादा आणण्यात आल्या होत्या अनेक भाविकांनी रस्त्याच्या दुरवर गाड्या लावून मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली. इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे सर्व सदस्य यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्त पुंडलिक मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात हर हर महादेव आरती घेण्यात आली. माऊली मंदिरात राहुल चव्हाण यांच्या तर्फे २५१ लिटर दूध वाटप

येथील माऊली मंदिरात अनेक वर्षां पासून भाविकांना दूध वाटप, खिचडी वाटप, केळी वाटप, महाप्रसाद असे अन्नदानासह धार्मिक कार्यक्रम प्रसंगी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांचे तर्फे माऊली मंदिरात महाप्रसाद वाटप उपक्रम राबविला जातो. महाशिवरात्री निमित्त २५१ लिटर मसाले दूध महाप्रसाद वाटप भाविकांना करत सामाजिक बांधिलकी जपत महाशिवरात्र साजरी करण्यात आली. यावेळी महाप्रसाद म्हणून दिले जाणारे दूध प्रसादास भाविकांनी रांग लावत प्रसाद घेतला. आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी शहर शिवसेना उपप्रमुख माऊली घुंडरे, शशिकांत बाबर, साईनाथ ताम्हाणे, नितीन ननवरे, महादेव पाखरे, विनायक महामुनी, दिनकर तांबे, तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे दोन तास झालेल्या दूध वाटपा वेळी  हजारो भाविकांनी मसाले दुधाचा लाभ घेतला.

इंद्रायणी नदी घाटावर आरती 

 याच बरोबर माऊली मंदिरात असणारे सिद्धेश्वराचे मंदिर येथे देखील सकाळ पासून भाविकांनी दर्शनास गर्दी केली होती. इंद्रायणी नदी काठावरील पुरातन वैतागेश्वर महाराज मंदिर, भक्त पुंडलिक महाराज मंदिर येथे इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांचेसह महिला भाविक आरती, पूजा करण्यास उपस्थित होते. वैतागेश्वर महाराज मंदिरात अतुल लोणकर, संतोष बोरंदिया, राहुल चव्हाण, बैजू काळे आदींचे वतीने महाशिवरात्री निमित्त आळंदी पंचक्रोशी शिव मंदिरात श्री काळ भैरवनाथ मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होती. शिवभक्तांना दूध महाप्रसादाचे वाटप  परंपरेने मोठ्या भक्तिमय उत्साहात धार्मिक मंगलमय वातावरणात महाशिवरात्र साजरी करण्यात आली.

 सिध्दबेटातील शिव मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली होती. येथील मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. शिवभक्तीमय वातावरण सर्वत्र पाहण्यास मिळाले. भाविकांचे गर्दीने मंदिर प्रागंण फुलून गेले होते. परिसरातील शिवमंदिरात भक्तांनी दिवसभर दर्शनासास गर्दी केली होती. माऊली मंदिरात भक्तांचा उत्साह होता. भक्तांचे दर्शनास व्यवस्था आळंदी देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने उत्तम ठेवली. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना श्रींचे दर्शनाचा लाभ देण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. माऊली मंदिरात पहाटे श्रीना अभिषेख पूजा, महानैवेद्य, कीर्तन, ११ ब्रम्हवृंदांचे वतीने महाशिवरात्रीचा रुद्राभिषेख मंदिरातील परंपरेने झाला.   

Post a Comment

0 Comments