कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक | तयाचा हरिख वाटे देवा || येथे संत तुकोबांनी कन्येला प्रथम स्थान दिले आहे, या न्यायाने संगीत सम्राट यादवराज फड यांची द्वितीय कन्या अँड. चंद्रिका फड महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर कठोर परिश्रमाने शासकीय शिष्यवृत्ती मिळवून ऑस्ट्रेलिया येथील सिडनी युनिव्हर्सिटीत एल. एल. एम. करण्यास रवाना झाली.
गेल्या दोन वर्षात वर्षांत अँड चंद्रिका फड यांनी पुणे शिवाजीनगर कोर्टात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने मोठ्या सिनीयर वकीलात आणि न्यायाधीशां समोर इंग्रजी भाषेवरील अधिकार वाणीने मोठ मोठ्या समारंभाततून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून, विद्वत्ता काय असते, हे दाखवून दिले आहे.
पहाता क्षणी छाप पडेल असे व्यक्तीमत्त्व, लाघवी स्वभाव आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर या क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना चंद्रिका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपलेसे करते, आपल्या अमोघ वाणीने सभागृह स्तब्ध करते. बॅडमिंटनच्या मोठ मोठ्या टूर्लामेन्ट जिंकून अनेक पारितोषिके तिने हस्तगत केली आहेत. शैक्षणिक कर्ज न घेता फक्त गुणवत्तेवर शिष्यवृत्ती मिळवून एल. एल. एम. ला जीवघेण्या स्पर्धेत यशस्वी होते. या मागे तीचे महीनोन महीने असलेले अथक परिश्रम, मोठा संघर्ष आणि जिद्द कारणी भूत आहे. कुशल बुद्धिमत्तेच्या जोरावरच ती यशस्वी झाली, याचे आई - वडील साक्षी आहेत. अशा ध्येयवादी अपत्याचा देवाला देखील आनंद होतो, येथे तर आई - वडील आहेत. आम्हाला अपार आनंद झाला. तीच्या जीवनाला कलाटणी देणारी ही घटना आहे. महाशिवरात्रीच्या महापर्वकाळी तीचे प्रस्थान ही घटना तिच्यावर असलेल्या दैवी कृपेची साक्ष देते. ती तीच्या क्षेत्रात शिखरावर पोचेल,हा विश्वास माता - पीता म्हणून संगीत संम्राट पं. यादवराज फड यांनी व्यक्त करीत अँड. चंद्रिका फड ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत मनापासून आशिर्वाद दिले.

Post a Comment
0 Comments