Type Here to Get Search Results !

आळंदी मेडिकल असोसिएशन तर्फे स्वच्छता उपक्रमास साहित्य सुपूर्द

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानास मास्क - ग्लोज भेट 

 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानास समाजातील विविध घटकां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानास सहकार्य करत आळंदी मेडिकल असोसिएशन यांनी सामाजिक बांधिलकीतुन २ हजार मास्क,  २ हजार हॅन्ड ग्लोज  आळंदी नगरपरिषदेकडे विनामूल्य भेट देत सुपूर्द केले. 

  हे साहित्य स्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. आळंदी मेडिकल असोसिएशनने दिलेल्या या सहकार्या मुळे अभियान अधिक सुरक्षित व प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने आळंदी मेडिकल असोसिएशनचे या सामाजिक उपक्रमासाठी आभार व्यक्त करण्यात आले आहे. अशा सहकार्यामुळे इंद्रायणी नदी स्वच्छता ही लोकचळवळ म्हणून अधिक बळकट होत असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरपरिषद गटनेते सचिन गिलबिले यांचे हस्ते साहित्य नगरपरिषदे कडे सुपूर्द करण्यात आले. 

  यावेळी महाराष्ट्र राज्य डॅाक्टर सेलचे अध्यक्ष डॅा. मनोजकुमार रांका, आळंदी डॅाक्टर असोसिएशनचे पदाधिकारी डॅा. विकास पाटील, डॅा. नितीनकुमार जाधव, डॅा. अंबालाल पाटील, नगरपरिषद आरोग्य विभागातील अधिकारी अर्चना भिसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments