Type Here to Get Search Results !

Alandi आदर्श माता अंजनाबाई दिवाणे यांचे निधन

 जेष्ठ आदर्श माता अंजनाबाई दिवाणे यांचे निधन 


 आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील जेष्ठ महिला, आदर्श माता अंजनाबाई किसनराव दिवाणे ( वय ९४ ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली, एक मुलगा, सून, नात सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते व एन. के. टी. ट्रस्ट चे आळंदी विभाग प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी मनोहर दिवाणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्ययात्रेस आळंदी व परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिक, सगे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments