अलंकापुरीत आदर्श माता विमलकाकू कुऱ्हाडे पाटील पुण्य स्मरणार्थ उपक्रम
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीतील ज्येष्ठ नागरिक, आदर्श माता, विविध विकास कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन श्रीमती विमलकाकू गोपाळराव कुऱ्हाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ संगीत सोहळ्याचे आयोजन हरिनाम गजरात करण्यात आले.
या संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता माऊली महाराज सावर्डेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरणात झाली. आदर्श माता विमलकाकू गोपाळ कुऱ्हाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आळंदीत विविध धार्मिक उपक्रमांनी पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला. या निमित्त शास्त्रीय संगीत भजन तसेच भागवत कथा ज्ञानयज्ञ संगीत सोहळा हरिनाम गजरात भाविक, वारकरी, नागरिक यांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्याचे आयोजन माजी नगराध्यक्ष विलासराव कुऱ्हाडे पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे पाटील, भैरवनाथ उत्सव कमेटी आळंदीकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील, रामभाऊ कुऱ्हाडे पाटील मित्र परिवार, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने आयोजन हरिनाम गजरात करण्यात आले होते.
या सोहळ्यात शास्त्रीय संगीत गायन, भागवत कथा ज्ञानयज्ञ उत्साहात झाला. श्रवण सुखाची अनुभूती भाविक, नागरिकांनी घेतली. सोहळ्याचे काळात हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. आळंदी पंचक्रोशीतील तसेच राज्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, संगीत भजन गायक, वादक, साधक तसेच भाविकांची मोठ्या उपस्थितीने विविध धार्मिक कार्यक्रमांस मोठी दाद मिळाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, उपरणे, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अन्नदान सेवेत हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप सोहळ्याचे काळात करण्यात आले. सोहळ्याचे यशस्वीतेसाठी कुऱ्हाडे पाटील परिवार आणि आळंदी ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments