संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्ष
३ ते १० मे कालावधीत धार्मिक ज्ञानयज्ञ सोहळाआळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवी वर्षा निमित्त आळंदीत ३ ते १० मे २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन, प्रवचन, भजन, संगीत गायन, कथा या अंतर्गत अंखड हरीनाम सप्ताह काळात धार्मिक ज्ञानयज्ञ सोहळा होत आहे. या सोहळ्यात भाविक, नागरिक, वारकरी, पंचक्रोशीतील ग्रामस्थानी सहभागी व्हावे असे आवाहन आळंदी संस्थान चे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी केले आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने आयोजीत या अखंड हरिनाम सप्ताहाची माहिती देण्यासह सोहळ्याचे तयारीचा आढावा घेत संस्थानने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माहिती देताना विश्वस्त डॉ. देखणे बोलत होते. या प्रसंगी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त राजेंद्र उमाप, निलेश महाराज लोंढे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वाहतूक पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, आळंदी ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय हवाई उडाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचेसह राज्यातून भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याचे डॉ. देखणे यांनी सांगितले.
यावेळी सप्ताहात होत असलेल्या धार्मिक पर्वणीची माहिती देताना डॉ. देखणे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळ, संध्याकाळी अशा दोन सत्रात कीर्तन सेवा, चरित्र चिंतन, प्रवचन, हरिपाठ, संगीत भजन उपक्रम राबविले जाणार आहेत. सोहळा आळंदीतील ग्रामदैवत श्री भैरवनाथ ग्रामदेवता ट्रस्ट च्या भव्य दिव्य प्रांगणात होत आहे. सर्व प्रकारची व्यवस्था पुरविली जाणार आहे. यात उन्हाळा असल्याने उन्हापासून भाविकांना गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात
येत आहे. या उत्सवात जास्तीत जास्त नागरिक, भाविकांनी आपली उपस्थिती द्यावी. तसेच पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे. सर्व पारायण वाचकांना ग्रंथराज पारायण प्रत प्रसाद भेट देण्यात येत असल्याचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी सांगितले. यावेळी डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, आळंदीतील बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे यांची कीर्तन सेवा पहिल्या दिवशी ३ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा ते साडे आठ या वेळेत रुजू होणार आहे. या निर्णयाचे आळंदी ग्रामस्थानी स्वागत केले आहे. बाळासाहेब महाराज शेवाळे आळंदीतील त्यागमूर्ती वै. जयरामबाबा भोसले सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था अनेक वर्षांपासून चालवीत आहे. यामुळे आळंदी ग्रामस्थांनी शेवाळे महाराज यांची कीर्तन सेवा व्हावी असा आग्रह देखील धरला होता. यास संस्थानने संमती दिली.
या सप्ताहात श्री संत तुकाराम महाराज , श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेवराय महाराज चरित्र चिंतन कथा श्रवणाची भाविकांना पर्वणी लाभणार आहे. पारायणास परगावाहुन आलेल्या भाविकांचं उत्तम निवास व्यवस्था आणि सोहळ्यात चहा, नाश्टा, दोन वेळचे प्रसाद भोजन व्यवस्था, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्यसेवा आदी बाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र उमाप, निलेश महाराज लोंढे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस माजी नगरसेवक राहुल चिताळकर, रोहिदास तापकीर, प्रशांत कुऱ्हाडे, संजय घुंडरे, श्रीधर सरनाईक, माऊली वीर, तुकाराम माने. राहुल चव्हाण, शंकरराव कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नंदकुमार कुऱ्हाडे यांनी केले. आभार राजेंद्र उमाप यांनी मानले. त्या नंतर कार्यक्रम स्थळाची तसेच सुरु असलेल्या मंडप उभारणी व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी सोहळ्याचे तयारीचे अनुषंगाने संवाद साधला. पसायदानाने आढावा बैठकीची सांगता झाली.


Post a Comment
0 Comments