Type Here to Get Search Results !

पहेलगाम येथील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध

 पहेलगाम येथील भ्याड हल्ल्याचा आळंदीत जाहीर निषेध

आळंदी पोलीस स्टेशन ला निवेदन  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ला हा एक प्रकारे भारतावर झालेला हल्ला आहे. या भ्याड हल्ल्यात पहेलगाम येथे पर्यटनास आलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सर्व पर्यटकांना श्रद्धांजली आणि चिरशांतीस माऊलीं चरणी प्रार्थना करण्यात आली.

   हल्ल्याचा जाहीर निषेध हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका यांचे वतीने करण्यात आला. यावेळी आळंदी पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांचे वतीने पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते निवेदन स्वीकारले. या प्रसंगी पुणे जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड, सचिव गौतम पाटोळे, सुहास सावंत, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सोमनाथ बेंडाले, अरुण कुरे, इम्रान हकीम आदी उपस्थित होते.        

Post a Comment

0 Comments