Type Here to Get Search Results !

alandi आळंदीत अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी ; स्वकाम सेवा रुजू

चैत्र गौरी पूजन आळंदी मंदिरात परंपरेने 

श्रींचे वैभवी रूपदर्शनास माऊली भक्तांची गर्दी ; श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रीमहाकल अवतार उटी  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात श्रीनां चंदन उटी लावण्यात येते. माऊलींचे संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्रींचे वैभवी श्री विठ्ठल रूप साकारण्यात आले. श्रींचे वैभवी रूप दर्शनासह चैत्र गौरी पूजनास महिलांसह भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. माऊली मंदिरात तसेच आळंदीतील विविध मंदिरांत दर्शनास गर्दी झाली होती. श्रींचे उटीसह गाभा-यात मोगरा फुलांची लक्षवेधी सजावट तसेच माऊलींचे संजीवन समाधी समीप श्रीचे श्री ज्ञानेश्वरी सह प्रतिकृती चंदन उटी पाहण्यासह भाविकांची गर्दी झाली होती. स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे वतीने सेवा रुजू करीत भाविकांना प्रसाद वाटप देखील करण्यात आले.   

    अक्षय तृतीये निमित्त आळंदी देवस्थान आणि स्वकाम सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर आणि सर्व स्वकाम सेवक साधकांनी उटीचे लक्षवेधी नियोजन करीत चंदन उटी सेवा रुजू केली. मंदिरात चैत्र गौरी पूजन, चंदन उटी दर्शन उत्साहात झाले. महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून श्रींचे दर्शन घेत हळदी-कुंकू घेतले. आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरी पूजना निमित आकर्षक सजावट करण्यात आली होती. चैत्र गौरीचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास महिला, भाविक, नागरिकांनी गर्दी केली.

   श्रीचे गाभाऱ्यात अक्षय तृतीये निमित्त संजीवन समाधीवर चंदन उटीतुन माऊलींचे श्री विठ्ठल रूप परिश्रम पूर्वक साकारण्यात आले. विविध वस्त्रालंकारांनी सजलेले श्रींचे रूप दर्शनास भाविकांनी गर्दी केली. आळंदी परिसरात साडेतीन मुहूर्ता पैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत विविध नवीन उपक्रम आणि वाहन खरेदी निमित्त वाहनाची मंदिरा बाहेर पूजा मोठ्या उत्साहात करण्यात आली.

 माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत अक्षय तृतीये निमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, पूजा आणि भाविकांचे दर्शन तसेच महिलांचा हळदी-कुंकू असे कार्यक्रम उत्साहात झाले.

 अक्षय तृतीया दिनी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे यांनी श्रींचे दर्शन घेत मंदिरातील नियोजन केले. या प्रसंगी मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक,संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, ज्ञानेश्वर पोंदे आणि सेवक यांनी देवस्थानच्या प्रथा प्रमाणे धार्मिक महत्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली. महेश गोखले आदींनी मंदिरातील व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाज पाहिले. भाविकांचे दर्शनाचे सुलभ नियोजन केले. येथील श्री संत गोरोबाकाका समाधी मंदिरात अक्षय तृतीया निमित्ताने भगवान परमात्मा श्री विठ्ठल अवतार चंदन उटी परिश्रम पूर्वक साकारण्यात आली. यासाठी संत गोरोबा काका यांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते आणि त्यांचे सहकारी बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रम घेतले. श्री सिद्धेश्वर मंदिरात श्री महाकाल अवतार चंदन उटी देवस्थान तर्फे साकारण्यात आली. भाविकांनी मंदिरात उटी पाहण्यासह दर्शनास गर्दी केली होती. अक्षय तृतीये निमित्त मंदिरात लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली. 


Post a Comment

0 Comments